SWIFT Code Manje Kay | स्विफ्ट कोड म्हणजे काय – तुमच्या बँक खात्याचा स्विफ्ट कोड कसा शोधायचा , SWIFT Code In Marathi – नमस्कार मित्रमंडळी ! आपण आज या लेखात जाणून घेणार आहोत की swift Code म्हणजे काय असते त्याचा उपयोग कशा प्रकारे केला जातो व त्याची आवश्यकता काय आहे,
कोणत्याही बँकेचा swift Code कसा ओळखायचा हे सर्व जाणून घेणार आहोत. कधी कधी लोक IFSC code आणि swift Code मध्ये गोंधळून जातात, हा सर्व गोंधळ आपण दूर करणार आहोत आणि swift Code IFSC code पेक्षा कसा वेगळा आहे हे सर्व जाणून घेणार आहोत .
स्विफ्ट कोड म्हणजे काय – SWIFT Code Manje Kay In Marathi
स्विफ्ट कोड म्हणजे सोसायटी फोर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शिअल टेलिकम्युनिकेशन (Society For Worldwide Interbank Financial Telecommunication) असा आहे. जसे की तुम्हाला नावावरूनच समजत असेल की हे
कोड इंटरनॅशनल सेटलमेंट साठी उपयोग केला जातो.
बँकेच्या इंटरनॅशनल सेटलमेंट मध्ये उपयोग होणारे बीआयसी (Business Identifier Codes) देखील स्विफ्ट कोड ला म्हटले जाते. SWIFT Code ला BIC Code,ISO9362 इत्यादी नावाने ओळखले जाते.एखाद्यावेळेस बँकिंगच्या परीक्षांमध्ये SWIFT Code च्या जागीं BIC Code किंवा ISO9362 अशा नावाने प्रश्न विचारले जातात तर यामध्ये अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही.
स्विफ्ट कोड हा 8 ते 11 अंकांचा कोड असतो . ज्यामध्ये बँकेचे नाव, बँक कोणत्या देशात आहे त्याची संपूर्ण माहिती, बँकेची लोकेशन आणि माहिती, बँकेच्या ब्रांच ची संपूर्ण माहिती या कोड मध्ये समाविष्ट असते.
स्विफ्ट कोडचा अर्थ – Swift code meaning in marathi
तुम्हाला कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी विचारण्यासाठी बँकेद्वारे SWIFT कोड वापरला जातो. याशिवाय तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवहार करू शकत नाही. SWIFT कोडला BIC (बँक आयडेंटिफायर कोड) असेही म्हणतात.
स्विफ्ट कोड पूर्ण फॉर्म – Swift code full form in Mrathi
स्विफ्ट कोडचे फुल फॉर्म सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन आहे.
फ्रेंड्स हे एक मेसेजिंग नेटवर्क आहे ज्याचा वापर वित्तीय संस्था त्यांची माहिती सुरक्षित मार्गाने पाठवण्यासाठी करतात. अनेक देश त्यांच्या बँकांसाठी वापरतात. ही एक अतिशय सुरक्षित पद्धत आहे.
स्विफ्ट कोड चा उपयोग– SWIFT Code Cha Upyog In Marathi
ज्याप्रकारे आपण भारताच्या अंतर्गत पैसे पाठवायचे असतील तर आयएफएससी कोड चा उपयोग करतो तशाच प्रकारे जेव्हा आपण विदेशातून पैसे मागवतो किंवा पाठवतो तेव्हा स्विफ्ट कोड चा उपयोग केला जातो. स्विफ्ट कोड चा उपयोग इंटरनॅशनल बँकिंगसाठी होतो. जेव्हाही आपण विदेशात पैसे पाठवतो किंवा मागवतो तेव्हा स्विफ्ट कोड च्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते की आपले कोणत्या देशात ,
कोणत्या बँकेत,कोणत्या ब्रांच मध्ये आपले पैसे पाठवायचे आहे किंवा मागवायचे आहे. हा एक असा कोड आहे ज्यामुळे दोन फायनान्शिअल आणि नॉन फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन मध्ये उपयोग केला जातो.या कोडचा उपयोग मुख्यता पैसे पाठवण्यासाठी केला जातो.या कोडला इंटरनॅशनल वायर ट्रान्सफर देखील म्हटले जाते.
स्विफ्ट कोडची आवश्यकता – SWIFT Code Chi Aavshyakata In Marathi
इंटरनॅशनल ट्रांजेक्शन साठी स्विफ्ट कोड ची आवश्यकता असते. स्विफ्ट कोड शिवाय तुम्ही इंटरनॅशनल ट्रांजेक्शन करू शकत नाही त्यासाठी स्विफ्ट कोडची आवश्यकता असते. जसे की आपल्या खात्यावरून विदेशात आपल्या परिवाराला अथवा मित्रांना पैसे ट्रान्सफर करायचे असतील तेव्हा आपल्याला स्विफ्ट कोड ची आवश्यकता असते.
स्विफ्ट कोड असल्यास आपण विदेशात पैसे पाठवू शकतो. पैसे पाठवण्यासाठी आपल्याला बँकेच्या ब्रांच वर स्विफ्ट कोड करावा लागतो .हा स्विफ्ट कोड देशाची ओळख, बँकेची, ब्रांच संपूर्ण माहिती दर्शवितो. याशिवाय तुमच्या बँकेचे ट्रांजेक्शन असुरक्षित आहेत. बँकेचे ट्रांजेक्शन सुरक्षित करण्यासाठी सी कोड योग्य मानला जातो.
कोणत्याही बँकेचा स्विफ्ट कोड कसा ओळखायचा – तुमच्या बँक खात्याचा स्विफ्ट कोड कसा शोधायचा
- स्विफ्ट कोड माहित करण्यासाठी पुढे तुम्हाला काही तेच दिलेल्या आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या बँकेच्या ब्रांच चा स्विफ्ट कोड माहित करून घेऊ शकता.
- सर्वप्रथम आपल्याला गुगल वर स्विफ्ट कोड सर्च करावा लागेल, तिथे आपल्याला स्विफ्ट कोड चेक करण्यासाठी भरपूर अशा लिंक भेटून जातील.
- इथे दिलेल्या लिंक वर स्विफ्ट कोड चा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुमचा जो पण देश (COUNTRY)आहे त्यावर क्लिक करा ,अथवा आपल्या देशाचे नाव टाका.
- त्यानंतर ज्या पण बँकेत तुमचा अकाउंट आहे त्याला सिलेक्ट करा.
- नंतर आपले राज्य (State) सिलेक्ट करा.
- या ऑप्शन मध्ये आपली सिटी म्हणजेच आपण ज्या शहरात राहतो ते शहर सिलेक्ट करा.
- आता आपल्याला बँकेच्या ब्रांचला सिलेक्ट करावा लागेल.
- यानंतर तुम्हाला स्क्रीन वर आपल्या बँकेचे ब्रांचे स्विफ्ट कोड आलेले दिसून जाईल आणि त्याच्याखाली बँकेचे संबंधित संपूर्ण माहिती देखील उपलब्ध असेल.
बँकेच्या ब्रांच मध्ये स्विफ्ट कोड (SWIFT Code) उपलब्ध नसल्यास काय करावे
प्रत्येक बँकेच्या ब्रांच मध्ये स्विफ्ट कोड उपलब्ध असेल असे नाही, कोणकोणत्या बँकेच्या ब्रांच मध्ये स्विफ्ट कोड उपलब्ध नसतो. जर तुमच्याही बँकेच्या ब्रांच चे स्विफ्ट कोड उपलब्ध नसेल तर तुम्ही या दोन पद्धतीनुसार आपला स्विफ्ट कोड बघू शकता.
1.जर तुम्हाला तुमच्या बँकेचे स्विफ्ट कोड माहित नसेल तर तुम्ही आपल्या जवळपासच्या शहराचा स्विफ्ट कोड वापरू शकता किंवा तुमच्याजवळ जिल्ह्याचे ही स्विफ्ट कोड उपलब्ध नसतील तर तुम्ही राज्य च्या ब्रांच चा स्विफ्ट कोड उपयोग करू शकता. ब्रांच वेगळी असू शकते परंतु बँक ही एकच असली पाहिजे
2.प्रत्येक बँकेचा डिफॉल्ट स्विफ्ट कोड असतो, यांचा उपयोग करून सुद्धा तुम्ही एडसेंस (Adsense) मधून पैसे रिसीव करू शकता.
माहित करून घ्या!!11 अंकांमधून कोणते अंक काय दर्शवितात ?
तुम्हाला माहित झाले आहे की स्विफ्ट कोड मध्ये 8 ते 11 अंक असतात. आता पण तुम्हाला हे सांगणार आहोत की एका स्विफ्ट कोड ला मुख्य रूपाने किती भागात विभागलेले असते. आणि कोणते अंक काय दर्शवितात. एक स्विफ्ट कोड मुख्य रूपाने चार भागात मी भाजलेले असतात.
ते खालील प्रमाणे:
- BANK CODE
- COUNTRY CODE
- LOCATION CODE
- BRANCH CODE
उदाहरणार्थ– RBFS–IN–BB–585
- BANK CODE– RBFS
- COUNTRY CODE– IN
- LOCATION CODE– BB
- BRANCH CODE–585
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
- शेड्युल बँक म्हणजे काय ? शेड्यूल बँकेचे कार्य
क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? क्रेडिट कार्ड कसे काढावे ,क्रेडिट कार्ड चे प्रकार
ई – बँकिंग म्हणजे काय ? – ई-बँकिंग चे प्रकार , इंटरनेट बँकिंग चे फायदे
विदेशी बँक म्हणजे काय ? विदेशी बँकेची भूमिका , विदेशी बँकेची नावे
सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
व्यापारी बँक म्हणजे काय आहे ? व्यापारी बैंकांची कार्ये, व्यापारी बँकेचे प्रकार
पहिल्या चार अंकांमध्ये बँक कोड A–Z पैकी कोणतेही असू शकते. (BANK CODE A–Z First And Four Characters)
11 अंकांच्या कोडमध्ये सर्वप्रथम पहिले चार अंक बँक कोड च्या नावावरून ओळखले जाते, हे चार अक्षर इंग्रजी वर्णमालेतील A–Z यापैकी कोणतेही असू शकते. सामान्यता हे पहिले चार अक्षर बँकेच्या नावाचे शॉर्ट फॉर्म असतात. म्हणजेच एक पासून चार पर्यंत हे अक्षर बँक कोड दर्शवितात. जे बँक आणि त्याची नावे दर्शवितात. कोणत्याही बँकेत पैसे पाठवायचे असतील तर हे पहिले 4 अंक माहित असणे आवश्यक आहे या चार अक्षरापासून समजते की आपल्याला कोणत्या बँकेत पैसे पाठवायचे आहे.
पाचवे व सहावे कंट्री कोड A–Z कोणतेही असू शकते – (COUNTRY CODE A–Z Fifth And Sixth Characters)
कंट्री कोडमध्ये दोन अक्षर असतात. स्विफ्ट कोड चे पाचवे आणि अक्षर कंट्री कोड साठी उपयोग केला जातो. यामुळे माहित पडते की बँक कोणत्या देशात स्थित आहे. बँक कोणत्या देशात आहे हे फक्त या दोन अक्षरात मुळे आपल्याला माहित पडते. हे दोन अक्षर A–Z यापैकी एखादे अक्षर असू शकते
सातवे व आठवे अंक हे लोकेशन कोड A–Z असू शकते – (LOCATION CODE A–Z Seventh And Eight Character)
लोकेशन कोड हे स्विफ्ट कोडचे तिसरे भाग आहे. लोकेशन कोडे दोन अक्षरांनी बनलेले असतात. लोकेशन कोड हे A–Z या अक्षरा पैकी एखादे असतात. स्विफ्ट कोड मध्ये सातवी आणि आठवे अंक हे लोकेशन कोड दर्शवितात. ज्यामुळे आपल्याला बँक कोणत्या देशाच्या अंतर्गत आहे हे माहित पडते. हे दोन्ही अंक कोणत्याही देशाच्या बँकेचा योग्य लोकेशन दर्शवण्यासाठी यांचा उपयोग केला जातो .यामुळे आपल्याला बँकेचे अचूक असे लोकेशन मिळते.
शेवटचे 4 अंक ब्रांच कोड A–Z असू शकतात – (BRANCH CODE A–Z Last Three Characters)
ब्रांच कोड हा स्विफ्ट कोड चा चौथा आणि शेवटचा भाग आहे. हा तीन अंकांनी तयार झालेला कोड असतो. पहिले स्विफ्ट हा आठ अंकांचा असायचा जे की बँकेचे हेड ऑफिसला रिप्रेझेंट करत होते, परंतु आता सामान्यता स्विफ्ट कोड हा अकरा अंकांचा असतो. आणि याची शेवटची तीन अक्षरे हे बँकेचे ब्रांच दर्शवितात.
स्विफ्टचे मुख्यालय कोठे आहे ? – swift headquarter in marathi
मित्रांनो, या संस्थेचे मुख्यालय (Society for Worldwide Interbank Financial Telecommunication), Swift code म्हणजेच मुख्यालय बेल्जियममध्ये आहे.
स्विफ्ट कोड बद्दल विचारले जाणारे प्रश्न – FAQ
Q 1. स्विफ्ट कोड चा फुल फॉर्म काय ?
स्विफ्ट कोड चा फुल फॉर्मसोसायटी फोर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शिअल कम्युनिकेशन असा आहे.(Society for worldwide interbank financial telecommunication )
Q 2. कोणतेही बँकेचा स्विफ्ट कोड कसा माहित करायचा ?
उत्तर : इंटरनेटवर भरपूर अशा वेबसाईट तुम्हाला प्राप्त होतील, ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या बँकेचे स्विफ्ट कोड माहीत करून घेऊ शकता.
Q 3. स्विफ्ट कोड आवश्यक का आहे ?
उत्तर: स्विफ्ट कोड ने गैर- बँक वित्तीय संस्थांसाठी नेटवर्कचा विस्तार केलेला आहे, ज्यामुळे त्यांच्या सदस्य द्वारे आवश्यक माहिती, विदेशी मुद्रा आणि सर्व प्रकारच्या वित्तीय स्वदेशाच्या आदान-प्रदान ला अनुमति मिळते.